मंजुळा शेट्ये प्रकरण : हायकोर्टाने सर्व आरोपींचे जामीन फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:30 PM2019-07-08T16:30:28+5:302019-07-08T16:42:07+5:30
सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मुंबई - मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह सर्व महिला आरोपींचा जामीन अर्ज आज हायकोर्टाने फेटाळला आहे.
२४ जून २०१७ रोजी मंजुळा शेट्ये हिला भायखळा तुरुंगातील महिला कारागृह रक्षकांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. या मारहाणीत मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य महिला कैद्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली होती. त्यांनतर या सर्व आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हायकोर्टाने देखील आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मंजुळा शेट्ये प्रकरण : मुंबई हायकोर्टाने सर्व आरोपींचे जामीन फेटाळले https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2019