मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. चारच दिवसांपूर्वी गृह मंत्रालयानं व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे सोपवला. या प्रकरणाबद्दल एनआयएनं न्यायालयात काल धक्कादायक माहिती दिली होती. गृह मंत्रालयाची सूचना मिळून ३ दिवस उलटूनही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं तपास हस्तांतरित केला नसल्याची माहिती एनआयएनं न्यायालयाला दिली होती. यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयानं एटीएसला महत्त्वाचा आदेश दिला आहे.आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता मनसुख हिरेन हत्येचा तपास तात्काळा थांबवा आणि तो एनआयएला सोपवा, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला दिले आहेत. त्यामुळे आता एटीएसला लगेचच मनसुख हिरेन प्रकरणातील पुरावे, कागदपत्रं एनआयएकडे हस्तांतरित करावी लागतील. विशेष म्हणजे कालच एटीएसनं पत्रकार परिषद घेत मनसुख हिरेन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचल्याची माहिती दिली होती.
Mansukh Hiren Case: तपास तात्काळ थांबवा, NIAकडे सोपवा; ठाणे सत्र न्यायालयाचे ATSला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:33 PM