मनसुख हिरेन हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए ही केंद्राची तपास यंत्रणा करत आहे. प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये मनसुख हिरेन हे एका मर्सिडीजमध्ये बसून गेले असल्याचे दिसत आहे. सीएसएमटी परिसरातील वालचंद हिरांचंद रोडवरील सिग्नलवर थांबलेल्या मर्सिडीजमध्ये बसून मनसुख गेल्याचे सीसीटीव्हीमधून दिसत आहे. त्यामुळे सचिन वाजेंना तर मनसुखभेटायला गेले नाही ना अशी शक्यता एनआयएला वाटत आहे . कारण वाजेंकडून ताब्यात घेतलेली गाडी ही तिच आहे. ज्या सीसीटीव्हीमध्ये मनसूख गाडीत बसताना दिसत आहे. हा सीसीटीव्ही १७ फेब्रुवारीचा रात्री ८.३० वाजताच्या सुमारास असून हे सीसीटीव्ही फुटेज गुन्हाची उकल करण्यास मदतीचा ठरणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांनाअटक केली होती. सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने त्यांना २५ मार्च पर्यंत NIA कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी संपली असून आज वाझे यांना विशेष NIA कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अटकेनंतर एनआयएच्या हाती त्याच्याविरोधातील बरेच महत्वाचे पुरावे लागले आहेत. सचिन वाझे आपला कामातील बहुतेक वेळ मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये घालवायचे. सचिन वाझे आठवड्यातील ४ ते ५ दिवस ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते. एनआयएच्या तपास पथकाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन शोध घेत तेथील अनेक सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केल्या आहेत. याच तपासणी दरम्यान सचिन वाझे बनावट ओळखपत्र तयार करुन या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत असल्याचे उघड झाले आहे.
आता तपासात आता एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही संशयित महिला हॉटेल ट्रायडंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण या महिलेने मास्क घातल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण जात आहे.