लग्नाआधी एकमेकांची हरप्रकारे हेरगिरी केली; समजल्यावर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 08:36 PM2020-02-01T20:36:05+5:302020-02-01T20:38:39+5:30

त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले होते. 

Before the marriage, each other spied; Upon understanding, matter reached a divorce | लग्नाआधी एकमेकांची हरप्रकारे हेरगिरी केली; समजल्यावर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले

लग्नाआधी एकमेकांची हरप्रकारे हेरगिरी केली; समजल्यावर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले

Next
ठळक मुद्देघटस्फोट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्नाआधीची ओळख बदलणे आणि एकमेकांवर हेरगिरी करणे. पहिल्या भेटीत या दोघांनीही हे संबंध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, पण एकमेकांबद्दलही शंका निर्माण झाली.

भोपाळ - भोपाळ येथील फॅमिली कोर्टात एक अनोखा प्रकरण समोर आला आहे. यात लग्नाआधी केलेली हेरगिरी व बोललेले खोटं उघड झाले, मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले. कोर्टात असे आढळले आले की, लग्नाआधी मुलाने सहा सिम बदलून एकमेकांची हेरगिरी केली आणि मुलीने सोशल मीडियावर चार बनावट आयडी बनवल्या. अशा प्रकारे जासूसीनंतर त्यांचे लग्न झाले, परंतु जेव्हा त्यांचे हे प्रताप एकमेकांसमोर आले. तेव्हा त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला.

घटस्फोट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्नाआधीची ओळख बदलणे आणि एकमेकांवर हेरगिरी करणे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षाची पत्नी भोपाळमधील शॉपिंग मॉलमध्ये कार्यरत आहे. नवरा सॉफ्टवेअर अभियंता आहे. दोघांची चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून भेट झाली. दोघांनी सोशल मीडियावर सहा महिन्यांपर्यंत गप्पा मारल्या, त्यानंतर त्यांची भेट झाली. पहिल्या भेटीत या दोघांनीही हे संबंध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, पण एकमेकांबद्दलही शंका निर्माण झाली. त्यामुळे सोशल मीडियावर स्वतंत्र सिम आणि अकाउंट्सद्वारे पती-पत्नीने एकमेकांची परीक्षा घेण्यात कसलीही कसर मागे सोडली नाही.

मुलाला नेहमी वाटायचे की शॉपिंग मॉलमध्ये काम करणारी मुलगी नेहमी नटून तयार असते, तिला मुलं प्रपोज करत असावीत आणि कदाचित तिने प्रपोजल मान्य केले असेल. याची पडताळणी करण्यासाठी त्याने अडीच वर्षाच्या प्रेमसंबंधादरम्यान सहा वेगवेगळ्या सिम्सद्वारे त्या मुलीकडे संपर्क साधला आणि तिची उलटतपासणी घेतली. त्याचप्रमाणे मुलीला भीती वाटत होती की, मुलाने ज्या प्रकारे सोशल मीडियावर तिला न पाहता प्रेम केले, त्याने इतर मुलींबरोबर असेच केले असावे. हे तपासण्यासाठी त्या मुलीने देखील चार वेळा फेक आयडीही बनवून त्या मुलाशी गप्पा मारल्या आणि त्याची हेरगिरी केली. जेव्हा त्यांना वाटले सर्व काही ठीक आहे, तेव्हा त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले होते. 

लग्नानंतर पती - पत्नीच्या खोट्या नात्याचे सत्य उघडकीस आले तेव्हा या गुपितातून पडदा उठला. वास्तविक, मुलगी लग्नाच्या वेळी म्हणाली होती की, तिला आई-वडील नाहीत आणि मामा - मामी हेच सर्व काही तिच्यासाठी आहे. लग्नानंतर पतीचा पत्नीच्या मेक अपवरून वाद निर्माण झाला आणि तो वाढला. जेव्हा स्पष्टीकरणासाठी पतीने आपल्या मामाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते अस्तित्त्वात नाही हे सिद्ध झाले. यानंतर, पटीने त्याचे सहा सिम्स बदलून केलेल्या हेरगिरीचे सत्य सांगितले. यावर पत्नीने बनावट आयडी बनवून केलेल्या हेरगिरीच्या कबुलीही दिली.

Web Title: Before the marriage, each other spied; Upon understanding, matter reached a divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.