उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्याच्या नादात एका तरूणाने त्याच्याच वडिलाच्या हत्येची सुपारी दिली. २ दिवसांपूर्वी कोळसा व्यापारी अरूण जैन यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपी मुलासोबत एकूण ३ लोकांना अटक केली. मुलाने वडिलाच्या हत्येसाठी १० लाख रूपयांची सुपारी दिली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना मेरठच्या ध्यानचंद नगरातील आहे. येथील कोळश्याने मोठे व्यापारी अरूण जैन यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. चेहरा झाकून आलेल्या काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
दिवसाढवळ्या घडवून आणलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी हत्याकांडाच्या खुलाशासाठी पोलिसांवर दबावही टाकला. त्यामुळे पोलिसांनी या केसच्या तपासासाठी अनेक टीम बनवल्या. त्यानंतर सर्व्हिलांस टीमने कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा सत्य समोर आलं. (हे पण वाचा : बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना)
बाप-लेकात होता वाद
पोलिसांनी या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर हत्याकांडावरील पडदा उठला. अरूण जैन यांचा मुलगा आयुष याला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न करायचं होतं. मात्र, त्याच्या वडिलांना दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावून द्यायचं होतं.
यावरून बाप-लेकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलाच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि एक स्कूटी ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.