बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:26 PM2021-08-16T18:26:25+5:302021-08-16T18:28:37+5:30
MLA Chandulal Patel granted anticipatory bail :ॲड.अनिकेत निकम यांनी पटेल यांच्यावतीने बाजू मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ दिले.
जळगाव : बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांना सोमवारी पुणे विशेष न्यायालयाने २० टक्के रक्कम दहा दिवसात व २० टक्के रक्कम पुढील तीन महिन्यात भरण्याचे आदेश तसेच अटीशर्ती व एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ॲड.अनिकेत निकम यांनी पटेल यांच्यावतीने बाजू मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ दिले.
पटेल यांनी २ कोटी रुपयांचे कर्ज बीएचआरमधून घेतले होते. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. इतर कर्जदारांप्रमाणेच त्यांनीही कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. सरकाकडून वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.
मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमाhttps://t.co/EsDOTU8IDF
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2021