वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:36 PM2021-03-26T19:36:57+5:302021-03-26T19:38:15+5:30
MLA Mangesh Chavan detains by Police : या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव : शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीचे अभियंता फारूख शेख यांना दोरीने बांधले. या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतक-यांनी शुक्रवारी दुपारी वीज कंपनीच्या कार्यालयात आले. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीच्या अभियंत्यांना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर आमदारासह आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या प्रकरणी वीज कंपनीच्या अभियंत्यांनी पोलिसात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात येत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
महावितरणच्या अधिका-यांनी काही शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून वीज कंपनीच्या अभियंत्यांना दोरीने बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे. -डाॅ.प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक, जळगाव.