मुंबई - साकीनाका येथे पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून फरार झालेल्या मोटारसायकलस्वारांना पोलिसांनीअटक केली आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून थांबविल्याचा राग मनात ठेवून त्यांनी वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली होती. घटनास्थळी सीसीटीव्ही नसून देखील पोलिसांना मोटारसायकलचा क्रमांक थोडा पाहिलेल्या होता. त्याआधारे १ दिवसात आम्ही आरोपी अब्दुल शेख आणि सद्दाम शेख या दोघांना अटक केली असल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.
साकीनाका भागात दुचाकीस्वारांची पोलिसांवर दादागिरी वाढली असून अनेकदा मुंबई पोलिसांवर हल्ले होत आहे. या हल्ल्यात वरळी येथे राहणारी एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू देखील झाला आहे. साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. त्याचा राग दुचाकीस्वाराने मनात ठेवला आणि त्यातील एकाने मिरचीचीपूड भालदार यांच्या डोळ्यात फेकली आणि दोघेही फरार झाले होते, भालदार यांना सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंजजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आणि घटनेच्या वेळी अंधार असल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण जात होते. मात्र पोलिसाने मोटारसायकलचा क्रमांक पहिला होता. तसेच आरोपींच्या हातातील लाल रंगाच्या रुमालावरून आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने अब्दुल शेख ,सद्दाम शेख या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांना २ ऑगस्टला अटक करून न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असल्याचे माने यांनी सांगितले.