मुंबई - चालत्या टॅक्सीतून ग्राफीक डिझायनर तरुणीचा आयफोन पळविण्यात आल्याची घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली. या प्रकरणी बुधवारी माटुंगा पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.कुर्ला परिसरात तक्रारदार ग्राफीक डिझायनर अश्विनी प्रेमनाथ वाडकर (२९) राहण्यास आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी तिने टॅक्सी पकडली. आयफोन ७ हा मोबाइल तिने बाजूलाच सीटवर ठेवला होता. साडेदहाच्या सुमारास टॅक्सी किंग्ज सर्कल ब्रिजवरून जे. एम. मेहता पुलावर पोहोचताच मागावर असलेल्या दुचाकीस्वार तरुणाने टॅक्सीच्या उघड्या असलेल्या काचेच्या भागातून हात घालून मोबाइल पळवला.तरुणीने आरडाओरडा करीत टॅक्सी थांबविली. तोपर्यंत दुचाकीस्वार पळून गेला होता. या प्रकरणी तरुणीने माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी माटुंगा पोलिसांनी मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवर दोघे होते. ते अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते. तरुणीने केलेल्या त्यांच्या वर्णनावरून माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीचा क्रमांक शोधण्याचे काम सुरू आहे.
चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:04 PM
घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली.
ठळक मुद्देमाटुंगा पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तरुणीने आरडाओरडा करीत टॅक्सी थांबविली. तोपर्यंत दुचाकीस्वार पळून गेला होता. दुचाकीवर दोघे होते. ते अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते.