मुकीम अहमद, शेख शफी हत्याकांड: आठ आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:54 PM2018-08-06T13:54:10+5:302018-08-06T13:55:14+5:30
अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शफी कादरी हे अकोला शहरातून ३० जुलै रोजी बेपत्ता झाले होते. २ आॅगस्ट रोजी मुकीम अहमद यांच्या पत्नी शहनाज यांनी खदान पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सात जणांविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहा पथकांचे गठन करून या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचा आदेश दिला. यामधील स्थानिक गुन्हे शाखेचे साहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे पथक गत तीन दिवसांपासून साखरखेर्डा जंगलात ठाण मांडून बसल्यानंतर त्यांनी दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शोधले. या दोघांची हत्या मौलवी तसब्बूर कादरी रा. अकोला, जब्बार खा सत्तार खा, सै.अस्लम सै. हुसेन दोघेही रा. वाकद बुलडाणा, शेख इम्रान शेख कदीर व शेख मुक्तार शेख नूर रा. मेहकर, शब्बीरशहा अन्वरशहा रा. खाकडी बुलडाणा, कारचालक संदीप आत्माराम दातार रा. जानेफळ, मो. शारीक मो. अब्दुल हक रा. चिखली, मुजफ्फर हुसेन साखरखेर्डा, शेख चांद, रौशन खान जब्बार खान पठाण रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, जावेद ऊर्फ दगड्या रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, शेख कौसर शेख अफसर साखरखेर्डा, फिरोज ऊर्फ भोले रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, शेख अजीम साखरखेर्डा बुलडाणा या १४ आरोपींनी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर यामधील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.