LoudSpeaker: नियम मोडत भोंगे वाजले; मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, दोन मशीदींवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:22 PM2022-05-07T13:22:01+5:302022-05-07T13:22:28+5:30
मुंबईतील अनेक मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही मशिदींना सायलेंट झोनमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी देखील आज दोन मशिदींच्या व्यवस्थापनावर मुंबई पोलिसांनी नियम मोडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात मशीदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापविले होते. यासाठी त्यांनी ३ मेची अंतिम तारीख दिली होती. तसेच यानंतर ज्या मशीदी भोंग्यांवर अजान लावतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला होता. राज्यातील सामाजिक स्थिती बिघडण्याची स्थिती असल्याने पोलिसांनी कारवाई सुरु केली होती.
मुंबईतील अनेक मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही मशिदींना सायलेंट झोनमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. तरी देखील आज दोन मशिदींच्या व्यवस्थापनावर मुंबईपोलिसांनी नियम मोडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरीही वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील कबरस्तान मशिदीच्या प्रशासनाने नियम पाळले नाहीत. यामुळे या दोन मशिदींच्या विरोधात मुंबई पोलिसांनी भादंवि कलम 188 आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम 37 (1), (3), 135 नुसार गुन्हा नोंद केला आहे. तसेच ध्वनि प्रतिबंधक कलम 33 (R)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.