ठाणे - नोकरांसमोर अपमानित केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील कोपरी मार्केटमध्ये घडली. महेश रतनमल चावला (४८, रा. किशोरनगर) असे मृताचे नाव आहे. दुकानातील वजनदार लोखंडी साधनाने डोक्यावर तीन ते चार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी मृताचा लहान भाऊ अनिल चावला (४५), नोकर शोबीत ऊ र्फ पिचकू सिंग (१९) आणि अभय ऊ र्फ गोरे अग्निहोत्री (१९) यांना अटक केली.ठाणे पूर्वेकडील कोपरी, गावदेवी मंदिरसमोर चावला बंधूंचे मे. रतन सुपरमार्केट हे तळ अधिक एकमजली दुकान आहे. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आरोपी अनिल चावला राहतो, तर दुकानासमोरील किशोरनगरमध्ये मृत भाऊ महेश हा पत्नी व दोन मुलांसह राहतो. दुकानात दोन कॅश काउंटर केल्याने महेशचे अनिलशी वारंवार खटके उडत होते. दुकानातील नोकरांसमोर अपमानित व्हावे लागत असल्याचा राग मनात धरून अनिल याने २ जुलैला सायंकाळी नोकरांना दुकानात बोलावून संधी साधत महेश याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून त्याची हत्या केली. अतिरक्तस्राव झाल्याने महेश जागीच ठार झाला. याप्रकरणी सख्खा भाऊ व दोन नोकरांना कोपरी पोलिसांनी अटक करून ठाणे न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.शिडीवरून पडल्याचा केला बनावहत्येनंतर अनिल याने शिडीवरून पडल्याने भावाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, तपासात बिंग फुटल्याने काही तासांतच हत्येचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.
अपमान केल्याच्या रागातून भावाची हत्या , लहान भावासह दोन नोकरांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 1:10 AM