मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आज सत्र न्यायालयाने आरोपी अविनाश पवारला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी अविनाश पवार, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर हे तिघेही एकाच सीम कार्ड अदलूनबदलून वापरत होते. एकाच सिमकार्ड वापरामुळे ते एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दिली. तसेच १७ डिसेंबर ते 18 जानेवारीपर्यंत वैभवकडून जप्त केलेले सिमकार्ड अविनाशकडे होते. याचदरम्यान सनबर्न फेस्टिवल होता. तसेच या कालावधीत तो घाटकोपर, पुणे आणि बेळगावात होता. आरोपी वैभव राऊतकडून हे सिमकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसने दिली आहे
Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा