लॉकडाऊन नावालाच, बारमध्ये झिंगाट; मयखाने तळीरामांनी ओव्हरफ्लो, रात्री अकरानंतरही सर्रास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:51 AM2021-01-23T08:51:33+5:302021-01-23T08:53:02+5:30

मीरा- भाईंदरमध्ये सुमारे १५० च्या घरात बार आहेत. त्यातही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने असलेले ३२ बार आहेत. याशिवाय १६ वाईन शॉप व ३५ बिअर शॉप आहेत. वाईन शॉप आणि बिअर शॉपच्या ३० मीटर परिघात मद्यपान करण्यास मनाई असते. येथे मात्र अनेक बिअर व वाईन शॉपच्या आवारात सर्रास मद्यपान सुरू असते.

The name of the lockdown itself, Zingat in the bar | लॉकडाऊन नावालाच, बारमध्ये झिंगाट; मयखाने तळीरामांनी ओव्हरफ्लो, रात्री अकरानंतरही सर्रास सुरू

लॉकडाऊन नावालाच, बारमध्ये झिंगाट; मयखाने तळीरामांनी ओव्हरफ्लो, रात्री अकरानंतरही सर्रास सुरू

googlenewsNext

धीरज परब

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये बारचालकांनी कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी सरकार व महापालिकेने जारी केलेली नियमावली सपशेल धुडकावून लावली आहे. वेळेचे बंधनही या बहुतांश बारवाल्यांनी झुगारून दिले आहे. मुळात या बारवाल्यांना नियमांचे पालन करण्याची सवयच नसल्याने अशा बार व त्यांच्या मालकांवर थातूरमातूर नव्हे, तर परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पण सर्वच संबंधित यंत्रणांचे हात ओले केले जात असल्याने उल्लंघनाकडे कानाडोळा करण्याचे कर्तव्य या यंत्रणा व्यवस्थित बजावत असल्याचे दिसून येत आहे. यंत्रणाच झिंगाट झाल्यावर कोण कोणाला बोलणार? हा खरा प्रश्न आहे.

मीरा- भाईंदरमध्ये सुमारे १५० च्या घरात बार आहेत. त्यातही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने असलेले ३२ बार आहेत. याशिवाय १६ वाईन शॉप व ३५ बिअर शॉप आहेत. वाईन शॉप आणि बिअर शॉपच्या ३० मीटर परिघात मद्यपान करण्यास मनाई असते. येथे मात्र अनेक बिअर व वाईन शॉपच्या आवारात सर्रास मद्यपान सुरू असते. काही बिअर शॉपवाल्यांनी तर दुकानाच्या बाहेरच पार्टीशन टाकून दारू पिण्याची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. काही वाईन शॉप, बिअर शॉपवालेच अगदी चकण्याची पाकिटेही विकत असतात. बिअर शॉपवाले तर फ्रीजचा चार्ज सांगून छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारतात. शहरातील एकाही बारमध्ये आता सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आसन व्यवस्थेचा सर्रास वापर केला जात आहे. 

सरकारी महसूल बुडीत
काही बार व ऑर्केस्ट्रा बारचालक परवान्यांचे नाव वेगळे आणि पाटी दुसऱ्याच नावाची लावतात. अनेक बारवाले तर परवाना भरताना दाखवलेल्या आसनव्यवस्थेपेक्षा जास्त संख्येने आसने ठेवून सरकारचा महसूल चोरी करतात.

नागरिकांना त्रास
मीरा-भाईंदर शहरात जी परिस्थिती आहे, त्यापेक्षा वेगळे काही चित्र शहराबाहेरील दुकानात दिसत नाही. तेथेही रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन सुरूच असते. त्या गोंधळाचा नागरिकांना त्रास होतो; पण सांगणार कोणाला, हा खरा प्रश्न आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?
कोरोनाच्या संसर्गामुळे बारचालकांना ५० टक्केच आसनव्यवस्था वापरण्याची परवानगी दिलेली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांनी मास्क- हातमोजे वापरणे सक्तीचे आहे. सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. काटेकोर स्वच्छता व येणाऱ्या ग्राहकांची तसेच कर्मचाऱ्यांची कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेणे बंधनकारक आहे. पण यातील कशाचेही पालन होताना दिसत नाही

वेळेचे उल्लंघन
बारसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे काटेकोर पालन केलेले नसते. अग्निशामक यंत्रणांचे उल्लंघन असते. बारसाठी दिलेल्या वेळेचे अनेकजण नियमित उल्लंघन करत असतात. त्याकडेही दुर्लक्ष हाेत आहे.
 

नियंत्रण यंत्रणा नावाला
मुर्धा, राई, डोंगरी, उत्तन, पाली, काजूपाडा, चेणा या परिसरातील बार, वाईन शॉप सर्रास रात्री एकपर्यंत सुरू असतात. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे; पण ती केवळ नावालाच आहे, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

सुरक्षिततेकडे डाेळेझाक
बारचे बहुतांश कर्मचारी हे मास्क व हातमोजे याचा वापरच करत नाहीत. सॅनिटायझेशन केले जात नाही. बार सुरू ठेवण्याची वेळ रात्री ११ पर्यंतची असताना, सर्रास रात्री साडेबारा ते एकपर्यंत सुरू असतात. यासाठी बारचालक यंत्रणांचे हात व्यवस्थित ओले केले जात असल्याने तेही नियमकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे.

 

Web Title: The name of the lockdown itself, Zingat in the bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.