शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

Naxalite : पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला नक्षल्यांचा घातपाताचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 8:16 PM

Naxalite : जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांना कोणत्याही हिंसक कारवाया करण्यात यश आले नसले तरी त्यासाठी त्यांनी केलेली तयारी उघडकीस आली. जंगलात जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य वेळीच पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे घातपात घडवून आणण्याचा नक्षलींचा डाव उधळला गेला.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविणारी सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होती. यादरम्यान ४ ऑगस्ट रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या कोटगुल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत हेटळकसा जंगल परिसरात कोरची, टिपागड एलओएस आणि कंपनी क्रमांक ४ च्या नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य एका ड्रममध्ये भरून जमिनीत पुरून ठेवले होते.

याबाबतची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान पथकाने शोधमोहीम सुरू केली. साहित्य सापडल्यानंतर स्फोटकांनी भरलेल्या एका कुकरचा स्फोट घडवून तो जागेवरच नष्ट करण्यात आला. इतर साहित्य गडचिरोलीत आणण्यात आले.

अन् शिताफीने शोधून काढली स्फोटके

- गुप्त माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथक गडचिरोली, सीआरपीएफ १९२ बटालियनच्या यंग प्लाटूनचे जवान आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी मौजा हेटळकसा जंगल परिसरात एका ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात यश मिळविले.

- हे साहित्य पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या टाकीमध्ये ठेवून ती टाकी जमिनीत गाडलेली होती. यामध्ये २ कुकर, त्यापैकी एक स्फोटकांनी भरलेला, ४ कार रिमोट, ३ वायर बंडल, ८ पॉकेट डिस्टेंबर कलर, पिवळ्या रंगाची पावडर (अंदाजे १ किलो), राखाडी पावडर (अंदाजे २ किलो), पांढरी पावडर (१ पाव), पांढरा दाणेदार पदार्थ (५० ग्रॅम) आणि २ नक्षल पुस्तकेही होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस