नवीन वर्षानिमित्त रेव्ह पार्टीची तयारी करत असलेल्या इव्हेंट आयोजकांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. एनसीबीने या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात चरस व गांजा हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो वागळे स्ट्रीट येथे राहतो.
नवीन वर्षापूर्वी आरोपी आयोजक रेव्ह पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मिळाली होती, रेव्ह पार्टीसाठी आयोजकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्जची व्यवस्था केली होती. या माहितीच्या आधारे नारकोटिक्स ब्युरोने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ सापळा रचला आणि आयोजकास अटक केली. अशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. गुप्तचर सूत्रांनी या व्यक्तीची एनसीबीला माहिती दिली त्याआधारे ही अटक करण्यात आले आहे. एनसीबीच्या पथकाने या शाहची अंगझडती घेतली आणि घटनास्थळाचा शोध घेतला असता जवळच 4 किलो चरस सापडला.एनसीबीच्या पथकाने अशरफ मुस्तफाची काटेकोरपणे चौकशी केली, नंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, अशरफ मुस्तफा शहा थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टी आयोजित करणार होता आणि या पार्टीमध्ये तो या ड्रग्जची विक्री करणार होता. तपासणी दरम्यान, हे स्पष्ट झाले आहे की, बर्याच तरुणांनी या पार्टीसाठी बुकिंग केले होते. शाहने जम्मू-काश्मीरमधून ड्रग्स मागवले असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.
आता एनसीबी अशरफ मुस्तफा शाह याच्या संपर्कात अजून कोणी आहे का ? याच्याकडून ते ड्रग्स खरेदी करत असतील का? याखेरीज एनसीबी ज्या लोकांकडे तो मुंबईत अमली पदार्थांची विक्री केली त्यांचा शोध घेत आहेत.