NCB ने आंतराराष्ट्रीय ड्रग्ज मोड्युलचा केला भांडाफोड, ८ जणांना अटक
By पूनम अपराज | Published: September 22, 2020 08:18 PM2020-09-22T20:18:23+5:302020-09-22T20:19:20+5:30
आरोपींच्या ताब्यातून सुमारे 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) कडक कारवाई करत हेरॉईन, कोकेन आणि गांजा तस्करीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलचा भांडाफोड केला आहे. एनसीबीच्या पथकाने नोएडा येथून म्होरक्यासह 8 जणांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून सुमारे 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, भारतात राहणारा एक आफ्रिकन हा या टोळीचा म्होरक्या आहे, त्याला नुकतेच अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 1.75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,या सिंडिकेटचे मॉड्यूल संपूर्णपणे भारतावर आधारित आहे, ज्याचा भंडाफोड करण्यात आला आहे. एनसीबीकडे केलेल्या अधिक तपासणीत असे दिसून आले आहे की, गेल्या काही महिन्यांत या सिंडिकेटने सुमारे 52 किलो कॉन्ट्रॅबॅंडची तस्करी केली आहे. 1 सप्टेंबर 2020 रोजी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन सुरू केले होते, जे 16 सप्टेंबर 2020 पर्यंत चालू राहिले.
जया साहा हिच्यावर अटकेची टांगती तलवार, NCB कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी https://t.co/L01vlBseMF
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2020
त्याअंतर्गत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रग सिंडिकेटच्या मुख्य आरोपींमध्ये दोन आफ्रिकन नागरिक आणि एक बर्मी नागरिक आहे. या कालावधीत 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा देखील जप्त करण्यात आला, अशी माहिती आज तकने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त
नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार
ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार
दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना