NCB ची मुंबईसह ठाण्यात छापेमारी; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 07:08 PM2021-04-18T19:08:59+5:302021-04-18T19:09:56+5:30
NCB Raid : अटक केलेल्या लोकांच्या ताब्यातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे.
मुंबईतील विविध ठिकाणी छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी तीन जणांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून ड्रग्ज जप्त केली. आग्रीपाडा, नागपाडा आणि बदलापूर येथे छापा टाकण्यात आला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या लोकांच्या ताब्यातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे.
राज्यात अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी एनसीबीने गेल्या काही आठवड्यांत कठोरपणे अशाप्रकारे छापेमारी सुरु ठेवली आहे. १५l एप्रिलला एनसीबीने महाराष्ट्रातील डोंबिवलीतील हायड्रोपोनिक उत्पादनाच्या दुकानातून दोन ड्रग पेडलर्सना अटक केली होती. एनसीबी मुंबईने मुंबईत ड्रग सप्लायर्स आणि पेडलर्सविरोधात सातत्याने कारवाई सुरु ठेवली आहे. एनसीबी मुंबईत २ ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एनसीबीने ३ जणांना विविध ठिकाणी अटक करून एकूण २२० ग्रॅम एमडी व ४३ किलो गांजा आणि २० लाख ५ हजार रुपये जप्त करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी मुंबईने १६५ ग्रॅम एमडी ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या झडती दरम्यान ड्रग्सची कारवाई करताच 2,15,000 / - रुपयेही जप्त केले. सरफराज @ पप्पीवर यापूर्वी एएनसी मुंबईने एनडीपीएस प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी चौकशीदरम्यान त्याने खुलासा केला की, नागपाडा येथील समीर सुलेमान शमा याने एमडी पुरविला होता. एनसीबीच्या पथकाने माहितीवरुन कारवाई केली आणि समीरच्या घराची झडती घेतली आणि १७ ग्रॅम एमडी व ९० हजार रुपये जप्त केल्याचे समजते. समीर सुलेमान घरात हजर नव्हता, मात्र एनसीबी मुंबई त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील तपास सुरू आहे.
तर बदलापूर येथे एका घरातून ४३ किलो गांजा ताब्यात घेतला आणि सनी परदेशी आणि अजय नायर या संशयितांना पकडले. कुणाल कडू या व्यक्तीकडून गांजाची माल खरेदी केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. हा गांजा ओडिशा राज्यातून खरेदी करण्यात आला होता. ओडिशाचा मुख्य सूत्रधार आणि पुरवठादार शोधण्यासाठी एनसीबी तपास करत आहे.
Maharashtra | In three separate raids in Mumbai, Narcotic Control Bureau (NCB) officials recovered MD drug worth Rs 25 lakhs, Rs 20 lakhs in cash, & over 40 kgs of ganja and arrested three drug peddlers: NCB pic.twitter.com/lAu6A0pmW9
— ANI (@ANI) April 18, 2021