ठळक मुद्देऋषिकेश पवार हजर राहिला नाही. पवारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, म्हणून आता एनसीबी त्याचा शोध घेत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आला होता, या प्रकरणात ड्रग्स अँगलचा तपास करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) आता त्याच्या आधीच्या ड्रीम प्रोजेक्टचे सहायक संचालक ऋषिकेश पवार हा चौकशीसाठी पाहिजे आहे. एनसीबी आता पवारचा शोध घेत आहेत. सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात पवारचा हात असल्याचा संशय एनसीबीला आहे.
ऋषिकेश पवार याच्या घराच्या झडतीदरम्यान एजन्सीला त्याच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद नोंद सापडली होती, त्यानंतर एनसीबीने त्यांना समन्स पाठवून हजर होण्यास सांगितले होते. पण ऋषिकेश पवार हजर राहिला नाही. पवारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, म्हणून आता एनसीबी त्याचा शोध घेत आहे.
पवारला शोधण्यासाठी एनसीबी कंबर कसत आहेत. कारण, सुशांतच्या कुक असलेल्या दिपेश सावंत यांनीही आपल्या जबाबत ऋषिकेश पवार हे नाव घेतले होते आणि सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे. अमली पदार्थ विरोधी एजन्सीने सुशांत प्रकरणापासून त्याची तपासणीची व्याप्ती फिल्म आणि टीव्ही उद्योगात पसरलेल्या ड्रग्ज पुरवठा करणार्यांच्या साखळीपर्यंत वाढविले आहे. या एजन्सीने ड्रग अँगलच्या तपासणीत अनेक लोकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, त्याच वेळी आता हे प्रकरण संपूर्ण चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या नावांपर्यंत पोहोचले आहे.दुसरीकडे, याप्रकरणाची मुख्य चौकशी करत असलेल्या सीबीआयला इतक्या महिन्यांनंतरही अंतिम अहवाल दाखल करता आला नाही. गेल्या महिन्यात राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) एक पत्र लिहून तपासाची स्थिती जाणून घेण्यास सांगितले होते, त्यास उत्तर म्हणून सीबीआयने म्हटले आहे की, सध्या या प्रकरणाची सखोल व व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रेही वापरली जात आहेत. तपासणी दरम्यान मृत्यूच्या सर्व बाबींचा विचार केला जात आहे आणि कोणत्याही अँगलमधील बारीक धागेदोरे देखील नाकारले जात नाही आहेत.