झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी ५० वर्षीय व्यक्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच त्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी केली होती, हे सर्व समोर आल्यानंतर मुलीच्या घरच्यांना धक्का बसला. ही घटना झारखंडमधील बाकोरा येथील आहे. मुलीला कळले की तिचा होणारा पती दुसर्या धर्माचा आहे, इतकंच नाही तर स्वतःला पोलीस म्हणवणारी ही व्यक्ती यापूर्वीच तुरुंगात गेली आहे. 50 वर्षीय अस्लमने अल्पवयीन हिंदू मुलीशी तिच्या कुटुंबाची फसवणूक करून लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी फरार आहे.
हे प्रकरण हरला पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. गुरुवारी, ८ डिसेंबरच्या रात्री दोघांचे लग्न होणार होते. आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचला. यावेळी तेथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस येईपर्यंत आरोपी फरार झाला होता.
त्या व्यक्तीचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. तो व्यक्ती यापूर्वीच तुरुंगात गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गरीब कुटुंबातील मुलींना फसवण्याचे काम करतो. पोलिसांनी आरोपीचे अल्टो वाहन जप्त केले असून त्यात पोलिसांचा गणवेश आढळून आला आहे. अस्लम असे आरोपीचे नाव आहे.
एक मध्यमवयीन व्यक्ती आपला धर्म लपवण्याच्या बहाण्याने एका मुलीशी लग्न करत होता. चास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात तो यापूर्वीही तुरुंगात गेला आहे. मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी
ओळख कशी झाली?
चौकशीत आरोपीने मुलीच्या आईला एका बँकेत भेटल्याचे समोर आले. त्याने सांगितले की त्याचे नाव संजय बेसरा आहे आणि तो बँक मॅनेजर आहे. त्याने महिलेला सांगितले की आपण तिचे कर्ज माफ करून देतो. दरम्यान, कर्जही पास झाले. यानंतर आरोपीने महिलेला फोन करून तिच्या घरी भेटायला सुरुवात केली.
तो पोलिसांच्या गणवेशात घरी यायचा आणि दुसऱ्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी म्हणून ओळख सांगायचा. गरिबीमुळे मुलीचे लग्न आरोपीसोबत लावण्यास कुटुंबीय राजी झाले.