मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेपेची शिक्षा; चाकूने केले होते वार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:13 AM2022-05-14T09:13:51+5:302022-05-14T09:13:57+5:30

खोपट येथील घटना: प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली होती.

Niece who murdered her aunt sentenced to life imprisonment; The stab was stabbed | मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेपेची शिक्षा; चाकूने केले होते वार

मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेपेची शिक्षा; चाकूने केले होते वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नाश्ता बनवला नाही या क्षुल्लक कारणावरून शोभा गणेश कुलकर्णी (७५) या वयोवृद्ध मावशीच्या डोक्यावर आणि डोळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९, रा. खोपट, ठाणे) हिला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी सुनावली. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली.

प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली. याच भांडणामध्ये रागाच्या भरात स्वप्ना हिने शोभा यांच्या डोक्यावर आणि डाव्या डोळ्यावर किचनमधील चाकूने वार करून तिचा खून केला. भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून आरोपी स्वप्ना हिने स्वत:च्या अंगावरील कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी आलेल्या राबोडी पोलिसांना मावशी पलंगावरून पडल्यामुळे मृत पावल्याचे कारण सांगितले. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे आणि उपनिरीक्षक हर्षल कुमार गावित यांना या वृद्धेच्या डोक्यावर जखमा आढळल्या. तसेच घरातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. त्याचवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात  ७ ऑक्टोबर २०१८ रोजी शवविच्छेदन झाले. या अहवालातही तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी स्वप्ना कुलकर्णीला अटक केली. 

    या खटल्याची सुनावणी ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी झाली. अतिरिक्त सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे तपासले. यात प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. 
    मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर न्या. ताम्हणकर यांनी आरोपी स्वप्ना हिला मावशीच्या खुनासाठी जन्मठेप तसेच दहा हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कैैदेची शिक्षा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

Web Title: Niece who murdered her aunt sentenced to life imprisonment; The stab was stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.