PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 03:23 PM2019-06-12T15:23:50+5:302019-06-12T15:24:15+5:30

Punjab National Bank Scam: आज चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर केला आहे.

Nirav Modi's bail rejected by court fourth time | PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला 

PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला 

googlenewsNext

लंडन - पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीचालंडनमधील रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिजने जामीन अर्ज फेटाळला आहे. आज चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर केला आहे. मात्र, अलीकडेच नीरवसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. १२ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याचे वृत्त चर्चेत होतं. 

नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. 





 

Web Title: Nirav Modi's bail rejected by court fourth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.