नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात विनय कुमार शर्मानंतर आणखी एक दोषी अक्षय ठाकूर यांनीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फाशीपासून सुटका करण्यासाठी दया याचिका पाठविली होती. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषी अक्षयची दया याचिका फेटाळली आहे.
Verdict On Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींची घटिका भरली?, सर्वांना एकाच वेळी देणार फाशी
Nirbhaya Case : विनयनंतर आता दोषी अक्षयने दाखल केली दया याचिका
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली
खालच्या कोर्टासह दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या निर्भयाचे चारही दोषी तिहार जेल नंबर -3 मध्ये आहेत. अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय कुमार शर्मा आणि पवनकुमार गुप्ता या चार दोषींना शनिवारी १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पटियाला हाऊस कोर्टाने नियम 836 चा हवाला देत चौघांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याचा उल्लेख केला आहे. जर अशी तरतूद केली गेली आहे की, जर दया याचिका प्रलंबित राहिल्यास दोषींना फाशी होऊ शकत नाही. मागच्या शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा निर्णय दिला होता.Nirbhaya case : अक्षय कुमार सिंहच्या फाशीची कायम, पुनर्विचार याचिका फेटाळली