Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:11 PM2020-03-16T16:11:28+5:302020-03-16T16:14:02+5:30

Nirbhaya Case : इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.

Nirbhaya Case: convicts move International Court of Justice (ICJ) pda | Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा

Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा

googlenewsNext
ठळक मुद्दे चारही दोषींना फाशीची शिक्षा लांबणीवर नेण्यासाठी तसेच टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले. फाशीची शिक्षा ठोठावण्या आलेल्या निर्भयाच्या चारही दोषींनी आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण आता वळणावर ठेवून ठेपले आहे. फाशीची शिक्षा ठोठावण्या आलेल्या निर्भयाच्या चारही दोषींनी आता आंतरराष्ट्रीयन्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यातच आज दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.



भारतातील कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात अलीकडेच खटला पार पडला. आता निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण देखील आंतरराष्ट्रीय कोर्टात चालणार का ? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ५ मार्चला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. राणा यांनी नवीन डेथ वॉरंट जारी केल्याची माहिती दिली. या वॉरंटनुसार २० मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मात्र, दोषी आंतरराष्ट्रीय कोर्टात गेल्याने पुन्हा फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या चारही दोषींना फाशीची शिक्षा लांबणीवर नेण्यासाठी तसेच टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले. 

Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी

 

Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी 

 

Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

 

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

 

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी

Web Title: Nirbhaya Case: convicts move International Court of Justice (ICJ) pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.