Nirbhaya Case : दिल्ली हायकोर्टाने तिहार जेलसह दोषींना धाडल्या नोटिसा; उद्या घेणार विशेष सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 09:16 PM2020-02-01T21:16:31+5:302020-02-01T21:19:48+5:30
निर्भयाचे दोषी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यासाठी कायद्याचा वापर करून मज्जा घेत आहे.
ठळक मुद्देस्थगितीला आव्हान देत केंद्र सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर रविवारी म्हणजेच उद्या २ फेब्रुवारीला दुपारी दिल्ली हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले होते.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला आव्हान देत केंद्र सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर रविवारी म्हणजेच उद्या २ फेब्रुवारीला दुपारी दिल्ली हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे. निर्भयाचे दोषी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यासाठी कायद्याचा वापर करून मज्जा घेत आहे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायाधीशांना सांगितले.
2012 Delhi gang-rape case hearing: Delhi High Court issues notice to Tihar jail authorities and the convicts. Hearing to be held tomorrow, 2nd February. https://t.co/ATWY27Ljve
— ANI (@ANI) February 1, 2020
न्यायाधीश सुरेश कैत यांनी तिहार तुरुंग महासंचालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस जारी करत केंद्र सरकारने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर त्यांचे म्हणणे मागवले. तसेच निर्भयाच्या दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षयसिंग ठाकूर या चारही दोषींना नोटीस पाठवली.निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र, दिल्ली कोर्टाने काल पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा आज देण्यात येणारी फाशी लांबणीवर गेली आहे. पुन्हा नवी तारीख निश्चित करण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे कोर्ट पुन्हा नवे डेथ वॉरंट काढेपर्यंत तिहार तुरुंग प्रशासनाला वाट पाहावी लागणार आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले होते.
Nirbhaya Case : विनयनंतर आता दोषी अक्षयने दाखल केली दया याचिका
Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव
‘निर्भया’च्या सर्व खुन्यांची आजची फाशी टळली, एका दोषीच्या दया अर्जामुळे शिक्षा तहकूब
Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट