नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे मुकेश याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेशने केलेल्या दया याचिकेमुळे फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.निर्भयाच्या चारही दोषींना २२ जानेवारीऐवजी आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार आहे, असे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. कोर्टाने नवीन डेथ वॉरंट जारी केला आहे.
Nirbhaya Case : दोषी विनयने तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न
गुरुवारी रात्री केंद्रीय गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. मात्र, आज राष्ट्रपतींना ही याचिका फेटाळली. त्यानंतर चौघांच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना पटियाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबले होते. मात्र ते अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार या चार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार हे अटळ आहे.
Nirbhaya Case : गुन्हेगारांची फाशी कायम ठेवल्यानंतर निर्भयाच्या आईने व्यक्त केली अशी प्रतिक्रिया...