धक्कादायक! तरुणीसह महिलेसोबत अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 01:54 PM2019-11-07T13:54:13+5:302019-11-07T13:57:43+5:30
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घाटकोपर आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - तरुणी व महिलेसोबत विकृताने अश्लील चाळे केल्याच्या दोन घटना मुंबईत घडल्या आहेत़ त्यानुसार, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घाटकोपर आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ला परिसरात राहणारी २३ वर्षीय तक्रारदार तरुणी मैत्रिणीसोबत कुर्ला कमानीच्या सिमेंट फॅक्टरीजवळून जात होती. तेथे एका विकृताने त्यांच्याशी अश्लील चाळे केले. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दोघींनाही या प्रकाराने धक्का बसल्याने त्यांनी तत्काळ घर गाठले. घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. संबंधित व्यक्तीबाबत माहिती काढताच त्याचे नाव कस्तान हुसेन असल्याचे समोर आले. त्यानुसार, रात्री उशिराने मुलींनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनीविनयभंगाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडाळा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिला मैत्रिणीसोबत सार्वजनिक शौचालयाकडे गेली असताना, आबीद यादअली शेखने त्यांंच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यांनी त्याला पकडून ओरड घालताच स्थानिकही जमले. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार, आरएके मार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत, शेखला अटक केली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली होती.