पुणे : पंतप्रधान अथवा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांमध्ये व्हॉटसअॅप, फेसबुकवरुन तू तू मै मै दररोजच सुरु असते. पण ‘मन की बात’मधील सल्ल्यावरुन सुरु झालेली टिकाटिपण्णी वेगळ्याच थराला गेली आहे. आणि कुत्र्यांवरुन ती घसरत थेट अश्लिलतेकडे झुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशी कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावर केलेल्या कॉमेंटवरुन पुण्यात राजकीय महिला कार्यकर्तीला फेसबुकवर अश्लिल मे पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.अमोल बाग, सारंग चपळगावकर आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका राजकीय पक्षाच्या महिला शाखेच्या पदाधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पोलिसांना कुत्र्यांची कशी मदत होते, याची माहिती देऊन देशी कुत्री पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावर या महिला पदाधिकाऱ्याने आपल्या फेसबुकवर ''चला तर भक्त मंडळी देशी कुत्री पाळायला सुरुवात करा, मालकांचा आदेश आहे आणि कुत्र्यासोबतचे फोटो टाकायला विसरु नका '' अशी पोस्ट केली होती. त्यावर असंख्य लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ अनेकांनी अशा पोस्टचा निषेध केला. त्यातील काहीही त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल व मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरली़ अनेकांनी सामाजिक पातळी सोडून भाषेचा वापर केला. त्यामुळे फिर्यादीने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’वरुन एका राजकीय कार्यकर्ती महिलेला अश्लिल मेसेज; सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:07 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशी कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला होता.
ठळक मुद्देफेसबुक अकाऊंटवर अश्लिल व मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी वापरली़ भाषा