ललितपूर जिल्ह्यातील रौंड़ा गावात वृद्धास लघवी जबरदस्तीने पाजल्याचा प्रयत्न केल्यानंतर मारहाण आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अत्याचार व छळ केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीने बुधवारी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. पीडितच्या घरी पोलिस तैनात होते, तरीही पीडित वृद्धाच्या पुतण्यास त्याच्या घराच्या मागील बाजूस पकडून आरोपीने त्याने प्राणघातक हल्ला केला.कुऱ्हाडीने हल्ला केल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जखमीचा भावाच्या तक्रारीनंतर मारहाण आणि अनुसूचित जातीय छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी पोलिस अधीक्षक कॅप्टन एम.एम. बेग यांनी पोलिस तैनात असूनही फरार आरोपीने मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि तैनात कॉन्स्टेबल या दोघांना निलंबित केले. कोतवाली पोलिसांनी वृद्ध आणि तरूणाला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी नरेंद्र उर्फ छोटू याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आणि पोलिस कोतवालीच्या रौंड़ा येथे अनुसूचित जातीच्या छळाखाली गुन्हा दाखल केला. तर अन्य आरोपी सोनू यादव फरार आहे.पोलीस ठाण्यातून या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीकडून पीडित आणि कुटुंबाला धोका असल्याचं सांगितले होते. यावरून अपर पोलिस अधीक्षक बृजेश कुमार सिंह, सीओ सिटी केशवनाथ, कोतवाली प्रभारी निरीक्षक यांनी गावात पोहोचून घटनास्थळाची माहिती घेतली आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वृद्ध व त्याच्या भावाच्या घरी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. ज्यामध्ये एक उपनिरीक्षक आणि दोन सशस्त्र सैनिक तैनात केले होते.बुधवारी पोलिस पीडितेच्या भावाच्या घराबाहेर पहारा देत असताना त्याचा पुतण्या नीरज (वय 22) काही कामानिमित्त घराच्या मागील बाजूस गेला. तेथे धाबा धरून बसलेल्या फरार आरोपीने त्याच्या पाच साथीदारांसह त्याच्यावर काठी आणि कुऱ्हाडीने हल्ला केला, त्यामुळे नीरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव झाला.नीरजने आरडाओरडा केल्यानंतर बाहेर उभे असलेले त्याचे कुटुंबातील सदस्य, उपनिरीक्षक आणि पोलिस घरात आत गेले आणि आरोपीला आव्हान दिले, पण तोपर्यंत तो अंधाराचा फायदा घेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला. यानंतर कुटुंबीयांनी जखमी नीरजला जिल्हा रूग्णालयात नेले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी जखमीचा भाऊ सरमन यांनी सांगितले की, जेव्हा तो घरातल्या इतर सदस्यांसह आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह घरात त्याच्या संरक्षणासाठी गेला असता सोनू यादवने आपल्या भावाला धमकावले आणि गोळीबारात पळून गेला.
वृद्धाला मारहाण करून पाजले मुत्र, पोलिसांसमोरच पीडिताच्या पुतण्यावर केला हल्ला
By पूनम अपराज | Published: October 15, 2020 5:56 PM
Crime News : पीडितच्या घरी पोलिस तैनात होते, तरीही पीडित वृद्धांच्या पुतण्यास त्याच्या घराच्या मागील बाजूस पकडून आरोपीने त्याने प्राणघातक हल्ला केला.
ठळक मुद्देकुऱ्हाडीने हल्ला केल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जखमीचा भावाच्या तक्रारीनंतर मारहाण आणि अनुसूचित जातीय छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.