फेसबुकवर मैत्री करत विवाहित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:30 PM2019-05-17T17:30:04+5:302019-05-17T17:31:59+5:30
फेसबुक अकाऊंटवरून एका विवाहित महिलेशी ओळख वाढवून, तिला लग्नाचे अमिष दाखवले.
लोणी काळभोर : फेसबुक अकाऊंटवरून एका विवाहित महिलेशी ओळख वाढवून, तिला लग्नाचे अमिष दाखवले.त्यानंतर शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यापासून ती दोन महिन्यांची गर्भवती राहिली. आरोपीने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेने उरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. मुगला मुस्तकीम अब्दुल हकीम अत्तार शेख ( रा. दत मंदिराजवळ, साने गुरुजी गल्ली क्रमांक - ५, मालेगांव, जि. नाशिक ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व शेख यांची डिसेंबर २०१७ मध्ये फेसबुक अकाऊंटवरून ओळख झाली होती. ते नंतर एकमेकांच्या संपर्कात होते. मागील वर्षी मुगला शेख वडकी येथे आला होता. तिच्याशी बोलून मी येथेच कोठेतरी नोकरी करणार असल्याचे सांगितले. पती कामावर गेल्यानंतर शेख महिलेच्या घरी जात होता. काही दिवसांनी आरोपी शेख याने तिच्या मुलांना सांभाळण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी महिलेला मालेगावला बोलावले. तिथे तिच्याशी संबंध ठेवले. पण मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगून तिला परत पाठविले. या दरम्यान महिला गरोदर राहिल्यानंतर तिने उरूळी देवाची पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान या करत आहेत.