साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त, आफ्रिकन नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:12 AM2019-11-27T03:12:19+5:302019-11-27T03:13:15+5:30

पबसह घरगुती पार्टींमध्ये मुंबईसह राज्यभरातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अमलीपदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

One crore cocaine seized from Sakinaka, African citizen detained | साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त, आफ्रिकन नागरिक अटकेत

साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त, आफ्रिकन नागरिक अटकेत

Next

मुंबई : पबसह घरगुती पार्टींमध्ये मुंबईसह राज्यभरातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अमलीपदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अल्ला कौदिओ बोरीस (४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ कोटी ३२ लाखांचे २२० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील रहिवासी असलेला बोरीस हा साकीनाका येथील ९० फूट रोडवर येणार असल्याची माहिती एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. बोरीस तेथे येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २२० ग्रॅम कोकेन सापडले. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरीस हा कोकेनचा विक्रीचा मुख्य विक्रेता आहे. तो पश्चिम उपनगरातील समुद्रकिनारी आयोजित केल्या जाणाºया घरगुती तसेच खासगी पार्टीत कोकेनची विक्री करीत असे. तसेच पबमध्येही तरुणाईला हेरून त्यांच्यापर्यंत कोकेन पुरवत असे. बड्या घरातील मुले, मुली त्याच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

पार्टी ड्रग टार्गेटवर
एएनसीने पार्टी ड्रगवर धडक कारवाई सुरू केल्याचे या कारवाईतून उघड होत आहे. त्यांनी शाळा, महाविद्यालयांतील विद्याार्थ्यांना एक्स्टसी(एमडीएमए) या अमलीपदार्थाची विक्री करणाºया उत्कर्ष पतंगे(२५) या तरुणाला रविवारी अटक केली. त्याच्याकडून एमडीएमएच्या ९७ गोळ्या हस्तगत केल्या.

Web Title: One crore cocaine seized from Sakinaka, African citizen detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.