धावत्या लोकलमध्ये तरुणींत जुंपली ढिश्शुम-ढिश्शुम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 03:19 PM2019-09-20T15:19:27+5:302019-09-20T15:21:23+5:30
धावत्या लोकलमध्ये तरुणींत जुंपली फ्रीस्टाईल, एक जखमी
मुंबई - लोअर परळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलच्या सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींमध्ये लोकलच्या डब्यामध्ये उभं राहण्यावरून वादंग निर्माण झाला. त्यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला जखमी केले. याबाबत पीडित जखमी तरुणीने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१६ सप्टेंबरला नजरीना पिल्ले (३५) ही तरुणी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास लोकलने प्रवास करत होती. बोरिवली स्लो लोकलच्या मधल्या सेकंड क्लास महिलांच्या डब्यात उभ्याने प्रवास करताना लोकल प्रभादेवी ते दादर रेल्वे स्थानकादरमायन धावत असताना गर्दीमध्ये नजरीनाच्या शेजारी उभी असलेल्या एका अज्ञात तरुणीस नजरीनाचा गाडीमध्ये गर्दी असल्याने चुकून नकळत धक्का लागला. त्यावेळी त्या तरुणीने नजरीनाच्या बरगडीवर जोराने धक्का मारला असता पीडित नजरीनाने विरोध करताच त्या तरुणीने तिचा हात पकडून मुरगळून नखाने हातावर ओळखडले. दरम्यान या हाणामारीत दादर रेल्वे स्थानक निघून गेले होते. नंतर पीडित तरुणीने माटुंगा पोलीस स्थानकात पोलिसांकडे चाल असे बोलली. यावेळी शिवीगाळ, मारहाण करत पीडित तरुणीच्या दोन्ही हाताने जोराचा बरगडीवर धक्का मारून डाव्या हाताच्या दंडावर चव घेऊन जखमी केले आणि शिवीगाळ करून आरोपी तरुणी माहीम रेल्वे स्थानकावर उतरून निघून गेली. या हाणामारीत नजरीना हिच्या बोटातील सोन्याची अंगठी गहाळ झाली. नंतर पुढे वांद्रे रेल्वे स्थानकात उतरून नजरीना हिने रेल्वे पोलिसांना मारहाण करणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भा. दं. वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ४२७ अन्वये गुन्हा वांद्रे रेल्वे स्थानकात दाखल करून घेऊन तो मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे पुढील तपासासाठी सोपविण्यात आला आहे.