दारू पिण्याच्या कारणावरून एकाची हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:48 PM2020-10-12T18:48:09+5:302020-10-12T18:48:21+5:30

Crime News, Washim बबन दत्तराव ठोंबरे असे मृतकाचे नाव आहे.

One murderd for drinking at Washim | दारू पिण्याच्या कारणावरून एकाची हत्या !

दारू पिण्याच्या कारणावरून एकाची हत्या !

googlenewsNext

वाशिम : दारू पिण्याच्या कारणावरून वाद घालत दगडाने डोके ठेचून एकाची हत्या झाल्याची घटना अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाई येथे १२ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बबन दत्तराव ठोंबरे असे मृतकाचे नाव आहे तर सुखदेव दुर्योधन ससाने, अंतऋषी शुक्राजी उगले दोघेही रा. वाई असे आरोपीचे नाव आहे.
वाई येथील बबन ठोबरे व आरोपी सुखदेव ससाने, अंतऋषी उगले हे रविवारी सायंकाळनंतर दारू पिण्यासाठी गावातच सोबत गेले होते. दरम्यान, तेथे दारू पिण्याच्या कारणावरून बबन ठोबरे आणि आरोपींमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन आरोपींनी दगडाने बबनचे डोके ठेचून जागेवरच ठार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाई येथीलच एका दुकानासमोरील ओट्यावर बबन ठोसरे यांचा मृतदेह टाकून दिला. या घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी अनसिंग पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. याप्रकरणी मृतकाची आई रुख्माबाई ठोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनसिंग पोलीस स्टेशन येथे १२ आॅक्टोबर रोजी दोन्ही आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत.

Web Title: One murderd for drinking at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.