जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर निघताच जंतूनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात घडली. या तरुणाला देवकर आयुर्वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील तरुण व तरुणी फैजपूर येथील महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत होते. या काळात विविध शालेय कार्यक्रम, सहली व स्पर्धांच्या निमित्ताने सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनिंनी एकत्र फोटो काढलेले होते. तेथे या तरुण व तरुणीची ओळख झाली होती. आता या तरुणीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला असून ती पतीसह रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे.
लग्न झाल्याचे लागले जिव्हारीदरम्यान, या तरुणीचे लग्न झाल्याने या तरुणाच्या जिव्हारी लागले. त्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीला काही दिवसापासून त्रास द्यायला सुरु केला आहे. तिला तसेच तिच्या पती व दिराला फोन करुन उलटसुलट माहिती देणे असे उद्योग सुरु केले. त्याच्यासोबत आणखी दोन तरुणही असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी शालेय जीवनातील फोटो तरुणीच्या पती व दिराला पाठविल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. त्यामुळे या तरुणीने संबंधित तरुण व त्याच्या दोन्ही मित्रांच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
तक्रारीवरुन चौकशीला बोलावलेतरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरुन रामानंद नगर पोलिसांनी या तरुणाला बुधवारी तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी त्यांच्या दालनात या तरुणाची चौकशी केली. यावेळी तरुणीलाही बोलावण्यात आले होते. त्याच्यासोबत वडील व भाऊ असे आले होते. तरुणी तक्रार देण्यावर ठाम असल्याने हा तरुण हादरला. गुन्हा दाखल झाला तर जेलची हवा खावी लागेल, ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे बडगुजर यांच्या दालनाच्या बाहेर निघताच त्याने खिशातून जंतुनाशक औषधाची बाटली काढली आणि त्याच्यातील औषध प्राशन केले. यानंतर त्याला लगेच उलट्या होऊ लागल्या. बडगुजर यांनी त्याला तातडीने रुग्णालयात रवाना केले.
तरुणीने तक्रार दिली तर तरुणाच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्याने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुध्दही वेगळा गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी सरकारकडून पोलीस कर्मचाºयाची फिर्याद घेण्यात येईल.-अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी