नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-५६ येथील गेस्ट हाऊसमधून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देहविक्रीचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे. याशिवाय दोन तरुणींदेखील पोलिसांनी ताब्यात आहेत. नेपाळ निवासी बुद्धिमान लामा आणि पंजाबमधील निवासी मोनू ही आरोपींची नावे आहेत. हे दोघे दिल्लीच्या टोळी चालवत होते.
आरोपींजवळ एक आयटेन आणि तीन मोबाइलसह २४९३० रुपयांची रोकड सापडली आहे. दिल्ली येथे राहणारा टोळीतील अन्य एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त यांनी सांगितले की, देहविक्रीसह ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या समावेश करून तपास केला जात आहे. ज्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यापैकी एक नेपाळची आणि दुसरी पश्चिम बंगालची आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या दृष्टीने देखील तपास करावा लागेल. माहिती देणाऱ्याने सांगितलं होतं की, सर्व डील ही Whats Appवर केली जाते. डील नक्की केल्यानंतर मुलींना देह व्यापारासाठी ठरविलेल्या ठिकाणी पाठवलं जातं.
महत्त्वाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या पथकामध्ये सदस्यांनी कस्टमर बनून बोलणं करण्यास सुरुवात केली आणि टोळीतील सदस्यांसोबत शनिवारी एक डिल पक्की झाली. सापळा रचल्यानंतर जेव्हा टोळीतील दोन सदस्य शनिवारी निर्धारित ठिकाणी मुलींना सोडण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
ळीतील सदस्य ५ हजार ते २० हजारात ग्राहकांसोबत डील करीत होते. यामध्ये मुलींना १५०० रुपये दिले जात होते. डील नक्की झाल्यानंतर टोळीतील सदस्य मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवित होते. ग्राहकांनाच हॉटेल, घर, कोठी सह अन्य ठिकाणांची व्यवस्था करावी लागत होती. टोळीचे सदस्य संपूर्ण डिल Whats App च्या माध्यमातून करीत होते.