ओशिवरा गोळीबार प्रकरणी मृत तरुणाचा बाप संशयाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:31 PM2019-07-23T21:31:16+5:302019-07-23T21:35:49+5:30
पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुंबई - ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीने गोळीबार करीत राहत्या घरी एका ३३ वर्षीय तरुणाची हत्या काल सायंकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास करण्यात आली आले. ओशिवरा पोलिसांनी पहिल्यांदा अपमृत्यूची नोंद केली होती. नंतर आज हत्येचा गुन्हा दाखल करून मृत तरुण विकी गंजीच्या पित्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पित्याच्या अनैतिक संबंधाला बाधा आणि विरोध असल्याने सुडापोटी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला अटक करण्यात आली आहे.
मृत विकी श्रीनिवास गंजी (३३) रा. जोगेश्वरी याची हत्या बंदुकीच्या गोळीबारात अज्ञातांनी केली. रॉकी गंजी हा जोगेश्वरीतील नर्मदा सोसायटी रूम क्र ३११ मध्ये वडील श्रीनिवास आणि मोठा भाऊ विकी यांच्यासोबत राहत होता. मृतक विकीची आई नेटी सांताक्रूझ परिसरात वेगळी राहते, विकी हा दीडवर्षापासून बेरोजगार होता. तर लहान भाऊ रॉकी हा एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आपला भाऊ विकी याची गोळीबारात हत्या झाल्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला ताब्यात घेतले. घटनेनंतर श्रीनिवास यांनीच विकी याला मृतावस्थेत सर्वप्रथम पहिले. या घटनेत स्थानिक नागरिकांनी मात्र पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृत विकी आणि पिता श्रीनिवास यांच्यात पटत नव्हते तर विकी हा घटस्फोटित आहे. श्रीनिवास यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे श्रीनिवास आणि मृत विकी यांच्यात वारंवार भांडणे होत होती. विकीच्या पत्नीने घर सोडल्यानंतर श्रीवास हा एका महिलेला घरापर्यंत आणत होता. यामुळे भांडणे होत होती. ही भांडणं इतकी विकोपाला गेली की, श्रीनिवास आणि विकी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळेच विकी याच्या हत्येनंतर ओशिवरा पोलिसांनी अनैतिक संबंधाला अडचण ठरणाऱ्या विकीचा काटा त्याचे वडील श्रीनिवास यांनी काढला असावा या संशयापोटी पोलिसांनी श्रीनिवास याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खुनासाठी वापरलेली रिव्हॉल्व्हर हि फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलेली आहे. या हत्येप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपस करीत आहेत.