पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:48 PM2019-02-19T17:48:51+5:302019-02-19T17:51:18+5:30
उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.
द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराष्ट्रीय कोर्टात कालपासून सुनावणी सुरु झाली असून आज या सुनावणीच्या दुसरा दिवस. काल दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. तर आज पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. त्यावेळी सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात युक्तिवाद करत होते. त्यावेळी आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्यक्ष अब्दुल कावी अहमद युसूफ यांनी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास टोकले. तसेच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करावा अशी मागणी पाकिस्तानतर्फे करण्यात आली होती. ती मागणी देखील कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने उद्या तिसऱ्या दिवसापर्यंत स्थगित केली आहे. उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.
जाधवच नव्हे तर भारतावरही पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान म्हणाले, 'मी स्वत: भारतीय क्रूरतेचा शिकार आहे. मी तरुण लष्करी अधिकारी म्हणून भारतीय तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० मुलांचे जीव गेले. हा भारताचा पाठिंबा असणाऱ्या अफगाणिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तानने आंतराष्ट्रीय कोर्टात नऊ मुद्दे ठेवले असून जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकिस्तानविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे. विचित्र वागणुकीतून कुलभूषण मुक्त, दोषमुक्त करा असा दावा भारताकडून केला जात आहे. मात्र, भारताकडे विश्वासाची कमरतात असल्याची टीका करत पाकिस्तानने युक्तिवाद केला आहे. उद्या दुपारी ३ वाजता भारत आणि पाकिस्तानला बाजू मांडण्यासाठी दुसऱ्यांदा वेळ देण्यात आली असून युक्तिवादात तेच तेच मुद्दे पुन्हा येऊ नयेत याची काळजी काळजी घेण्याचे कोर्टाने बजावले आहे.
काल पार पडलेल्या सुनावणीवेळी दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. यावेळी यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून, तब्बल 13 वेळी विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस दिलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला अजेंडा पुढे रेटू पाहत आहे, असा आरोपही साळवे यांनी केला.
कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात