पाकिस्तानातील एका बिझनेसमनवर आरोप आहे की, त्याने १ हजार पेक्षा जास्त लोकांना नकली कोरोना वॅक्सीन दिली आहे. मोहम्मद युसूफ अमदानी नावाच्या या व्यक्तीबाबत रिफॉर्मा नावाच्या वृत्तपत्रात रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. या रिपोर्टनुसार, यूसूफने मेक्सिकोचं शहर केम्पेशमध्ये आपल्या टेक्साटाइल फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांनी ही नकली वॅक्सीन दिली.
मोहम्मद हा होंडुरासमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. यूसूफने रशियाहून Sputnik V वॅक्सीन इंपोर्ट केली होती. युसूफवर आरोप आहे की, त्याने ही वॅक्सीन केवळ आपल्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर आपल्या जवळच्या लोकांनाही दिली आङे. ज्यात कंपनीचे एक्झिक्युटीव आणि काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
रिफॉर्माच्या रिपोर्टनुसार, मार्च १० ला ओशन व्ह्यू हॉटेलमध्ये युसूफने आपल्या जवळच्या लोकांना वॅक्सीन दिली होती. यानंतर १५ मार्चला त्याने त्याच्या टेक्सटाइल फॅक्टरीमध्ये फेक वॅक्सीन कर्मचाऱ्यांना दिली. सोबतच काही टॅक्सी ड्रायव्हर्सनाही त्याने ही वॅक्सीन लावली.
ही घटना मेक्सिकोमधील घडली आहे. युसूफ हा तिथे बिझनेस करतो. मेक्सिको प्रशासनाने शिल्लक राहिलेल्या वॅक्सीन जप्त केल्या आहेत. असे सांगण्यात आले आहे की, वॅक्सीनचे फोटो, कंटेनरचे डिझाइन आणि लेबल पाहिल्यावरच स्पष्ट होतं की, ही फेक वॅक्सीन आहे. रिफॉर्माच्या रिपोर्टनुसार, ही वॅक्सीन जप्त करण्यात आल्यानंतर युसूफच्या फॅक्टरीवर लॉक लागलेलं दिसलं आणि वर्कर्सना ४ एप्रिलपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि पोलीस मोहम्मद युसूफच्या शोधात आहे. मेक्सिकोने रशियासोबत जानेवारीमध्ये अॅग्रीमेंट केलं होतं आणि २४ मिलियन Sputnik V वॅक्सीन मागवली होती. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये ४ लाख वॅक्सीन पोहोचल्या आहेत. मेक्सिकोमध्ये आतापर्यंत जवळपास ६० लाख लोकांना वॅक्सीन दिली गेली आहे.