५० लाख पोलीस फंडाला दे अथवा माफी माग, कंगनाला माजी अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:55 PM2020-09-07T20:55:38+5:302020-09-07T20:57:35+5:30

९ तारखेला मुंबईत आल्यानंतर पालिकेकडून कंगनाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, अशी चर्चा आहे.  

Pay Rs 50 lakh to police fund or apologize, notice sent to Kangana by former police officer | ५० लाख पोलीस फंडाला दे अथवा माफी माग, कंगनाला माजी अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

५० लाख पोलीस फंडाला दे अथवा माफी माग, कंगनाला माजी अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

Next
ठळक मुद्देसंपूर्ण देशाला आदर असलेल्या मुंबई पोलिसांना हिणवले असून एक भारतीय नागरिक आणि एक सामान्य मुंबईकर या नात्यान मला पटणारे नाही.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासोबतच मुंबईत सध्या कंगना राणौतचा वाद चिघळत चालला आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राविरोधात बदनामीकारक ट्वीट करणं अभिनेत्री कंगना राणौतला भोवणार असल्याचं दिसत आहे. कंगनाविरोधात गोरेगाव वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  तर दुसरीकडे मुंबई पोलिसांविरूद्ध बदनामीकारक विधाने केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या माजी अधिकाऱ्याने कंगनाला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत असे म्हटले आहे की, कंगनाने हे ट्विट मागे घ्यावे आणि माफी मागावी अन्यथा तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. नाहीतर पोलीस फंडात ५० लाख रुपये देण्याची मागणीही केली आहे. ९ तारखेला मुंबईत आल्यानंतर पालिकेकडून कंगनाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, अशी चर्चा आहे.  

कंगनाच्या ट्वीटमुळे महाराष्ट्र सरकारच्या अस्मितेला धक्का पोचला आहे. संपूर्ण देशाला आदर असलेल्या मुंबई पोलिसांना हिणवले असून एक भारतीय नागरिक आणि एक सामान्य मुंबईकर या नात्यान मला पटणारे नाही. मुंबईला पीओके असे म्हणून तिने संबंध महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल आहे. ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत असून, कोण मला रोखतं ते बघू असे खुले आव्हान तिने महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा आणि मुंबई पोलिसाच्या प्रतिष्ठचा मुद्दा बनला असल्याचंही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. त्यविरोधात आदित्य सरफरे यांनी शनिवरी मुंबई अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात तक्रारीची प्रत पाठविण्यात आली. आता कगना विरोधात दोन दिवसात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याने भारतीय दंड विधान कलम 499 ,1PC500 आणि 124A  लावण्यात यावे, अशा तक्रारदाराने विनंती केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.

काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

Web Title: Pay Rs 50 lakh to police fund or apologize, notice sent to Kangana by former police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.