पेण बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपी आदेश पाटीलला ८ दिवसांची पोलीस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 04:30 PM2020-12-31T16:30:13+5:302020-12-31T16:31:18+5:30
Pen Rape and Murder Case : पेण येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणी अलिबाग न्यायालयाचे आदेश
रायगड - पेण येथील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्या आदेश पाटील याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने 8 जानेवारी 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
30 डिसेंबर 2020 राेजी पेण येथील मळेघर वाडी येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली हाेती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला. आराेपीला पाेलिसांनी तातडीने अटक केली हाेती. गुरुवारी त्याला अलिबाग येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजूने कोणीही वकील हजर झाला नाही. दरम्यान, पेणमध्ये आज आदिवासी समाजबांधवांसह नागरिकांनी पेण बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध केला.