तरूणीने आधी वडिलांना हॉटेलमध्ये नेलं, नंतर दारू पाजली अन् केरोसिन टाकून जिवंत जाळलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:43 AM2021-03-23T09:43:52+5:302021-03-23T09:46:19+5:30
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, महिला रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होत.
कोलकत्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. इथे २२ वर्षीय तरूणी आधी वडिलांना एका रेस्टॉरन्टमध्ये घेऊन गेली. तिथे त्यांनी जेवण केलं. वडिलांनी मद्यसेवन केलं. त्यानंतर कथितपणे तिने त्यांची हत्या केली. पोलिसही ही घटना पाहून हैराण झाले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, महिला रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होत. तिथे तिने वडिलांना दारू पाजली. यानंतर दोघेही स्ट्रॅड रोडवरील चडपाल घाटावर फिरण्यासाठी केले. ते म्हणाले की, जेव्हा तरूणीचे वडील(५६) नदी किनारी झोपले तेव्हा तिने त्यांच्यावर केरोसिन टाकून त्यांना जिवंत जाळलं. (हे पण वाचा : लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली)
पोलिसांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आणि महिलेने सुद्धा आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यांनी सांगितले की, पार्क सर्कसजवळ क्रिस्टोफर रोडवर राहणाऱ्या महिलेला तिच्याच एका नातेवाईकांच्या तक्रारीवरून अटक केली आहे. (हे पण वाचा : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त; चुलत मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल)
काय होतं कारण?
अधिकारी म्हणाले की, 'महिलेने चौकशी दरम्यान आरोप लावला की, जेव्हा ती लहान होती तेव्हाच तिची आई वारली होती. तेव्हापासूनच तिचे वडील तिचं लैंगिक शोषण करत होते. तरूणीचं लग्न झालं तेव्हा हे सगळं बंद झालं होतं. पण तिचं लग्न तुटलं आणि ती घरी परतली. तेव्हा पुन्हा लैंगिक शोषण सुरू झालं'.
पोलीस महिलेकडून लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत आहे. वडिलांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या महिेलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.