ठळक मुद्देडॉर्नियर २२८ हे विमान गोमापासून ३५० किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे असलेल्या बेनी येथे निघाले होते. विमानात १७ प्रवासी आणि २ वैमानिक होते. त्याचप्रमाणे सकाळी नऊ, सव्वा नऊ वाजताच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले होते.
गोमा - गोमा येथे विमान दुर्घटना झाली असून या अपघातात १९ प्रवासी आणि दोन वैमानिक यांचा या मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एअरलाईन्स आणि प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहेत.
डॉर्नियर २२८ हे विमान गोमापासून ३५० किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे असलेल्या बेनी येथे निघाले होते. त्यानंतर गोमा एअरलाईन्सच्या परिसरात काही अंतरावर हे विमान कोसळले. बिजी बी एअरलाईन्सचे कर्मचारी हेरिटिअर यांनी सांगितले की, विमानात १७ प्रवासी आणि २ वैमानिक होते. त्याचप्रमाणे सकाळी नऊ, सव्वा नऊ वाजताच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले होते.