४४ लाखांवर डल्ला मारणारे अटकेत, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:36 AM2019-10-02T03:36:12+5:302019-10-02T03:37:08+5:30

लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेच्या अनारक्षित तिकिट विक्री केंद्रावर ४४ लाख रुपयांचा डल्ला मारणाºया चार जणांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

Police arrested the railway employees for 44 lacks fraud | ४४ लाखांवर डल्ला मारणारे अटकेत, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

४४ लाखांवर डल्ला मारणारे अटकेत, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

googlenewsNext

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेच्या अनारक्षित तिकिट विक्री केंद्रावर ४४ लाख रुपयांचा डल्ला मारणाºया चार जणांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी समीर ताराबोडकर, कुमार पिल्ले, अजित देशमुख, मोरेश्वर कदम ही त्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेला समीर हा कॅशिअर आणि कुमार हा मुख्य हेडक्लार्क म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये काम करत होते. तिकिट विक्रीतून मिळालेली रक्कम ठेवण्यात येणाºया कक्षात कॅशिअर आणि बुकिंग क्लार्क वगळता येथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे समीर आणि कुमार यांची चौकशीला सुरूवात केली होती. २८ सप्टेंबरपर्यंत यांना पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून अन्य दोघांनाही अटक केली असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली.
मोरेश्वर हा देखील रेल्वे कर्मचारी असून अजित रंगकाम करण्याचा व्यवसाय आहे. ताराबडकर आणि पिल्ले यांनी ही रक्कम चोरी करून मोरेश्वरकडे दिली होती. मोरेश्वरने ही रक्कम लपवण्यासाठी कोपरखैरणे येथे राहणार अजित यांच्याकडे देण्यात आली होती, त्यांनंतर पोलिसांनी अजितच्या घरातून चोरी गेलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे. या चारही आरोपीना पोलिस कोठडी पाठविण्यात आले आहेत. रेल्वे सेवेतून सुध्दा निलंबीत करण्यात आले आहे.
२२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेच्या तिकिट विक्री केंद्रावर ४४ लाख रुपयांचा डल्ला मारल्याची घटना घडली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडीस आली़

Web Title: Police arrested the railway employees for 44 lacks fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.