लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गस्तीदरम्यान सशस्त्र दरोड़ेखोरांच्या हालचाली पोलिसांनी हेरल्या. त्यांचा पाठलाग करताच, चौघांंनी पळ काढ़ला. पोलीस शिपायाने एकाचा पाठलाग करत त्याला पकड़ले. दोघांमध्ये झटापट सुरु झाली. लुटारूने जवळील स्प्रे पोलिसाच्या डोळ्यात मारून त्याला मारहाण सुरु केली. मात्र, पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत शिपायाने त्याला पकड़ून ठेवले. अखेर, घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत, शिपायाला रुग्णालयात दाखल केले. हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटणारी ही घटना कुरारमध्ये घडली आहे.
२६ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपीनी कुरार परिसरातील भूषण वॉइन शॉपचे शटर उचकटून ४५ हजार रुपयांच्या ऐवजावर लुटारूने हात साफ केला आहे. त्यानुसार, गुह्याची कार्यपद्धतीवरून कुरार पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण पथकाने गस्त वाढवून आरोपीचा शोध सुरु केला. यादरम्यान ३० डिसेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पथकाचे पोलिस शिपाई विक्रम वेदांते यांना मालाड पूर्वेकडील आदर्श नगर येथे एका ऑटोमध्ये बसलेले काही जण गुह्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत, अन्य अधिकाऱ्यांंना माहिती देत घटनास्थळी येण्यास सांगितले. यादरम्यान रिक्षातील पाच जणांना हटकताच त्यापैकी चौघांंनी रिक्षा सोडून पळ काढ़ला. तर, एकाचा पाठलाग करून त्याला पकड़ले.
यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. दरम्यान आरोपीने त्याच्याकडील पेपर स्प्रे त्यांच्या डोळ्यात मारत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदांते यांनी त्याला पकड़ून ठेवले. वेदांते यांच्या डोळ्यात जळजळ होत असल्याचा फायदा घेत आरोपीने त्यांना मारहाण करत स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदांते यांनी ही प्रतिकार करत त्याला पकड़ून ठेवले. हारून जैदुल सरदार (३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मालवणीचा रहिवासी आहे. वेदांते यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी नितीन गिजे आणि अंमलदार यांनी कारवाई केली. सरदारच्या चौकशीतून त्याचा पळून गेलेला साथीदार राज दिवाकर (२४) याला अटक केली आहे.
मुंबईत ४६ घरफोड्यासरदार विरुद्ध मुंबईत घरफोडी, चोरीप्रकरणी ४६ गुन्हे नोंद आहेत. चारकोप, गोरेगाव, कुरार, अंबोली, मालाड, मालवणी, दिंडोशी, कांदीवली, कस्तुरबा, जोगेश्वरी, एमआयडीसीसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
बालविवाहाच्या गुह्यांतही अटकराज दिवाकर विरुद्ध मालाड, कांदीवलीसह मालवणी पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.