'सॉरी मॉम' असे सुसाईड नोटमध्ये लिहून पोलीस शिपायाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:45 PM2021-06-22T20:45:00+5:302021-06-22T20:45:47+5:30
A police constable committed suicide : रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलात भोर राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असं या पोलीस शिपायाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते. मात्र, तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी थेट तो राहत असलेल्या ठिकाणी आले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. घटनास्थळी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
कांदिवली पूर्व येथील पोयसर जनता नगर येथे जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचाऱ्याने विझवली आग, अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंतांनी केलं कौतुक #Fire@MumbaiPolicepic.twitter.com/ePmGTQkyTp
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
कांदिवली पूर्व येथील पोयसर जनता नगर येथे जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचाऱ्याने विझवली आग, अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंतांनी केलं कौतुक #Fire@MumbaiPolicepic.twitter.com/ePmGTQkyTp
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांना मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली. यात रज्जाकने सॉरी मॉम असे लिहिले होते. तसेच रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी नसही कापून घेतली होती. त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान सध्या या घटनेचा संपूर्ण तपास सुरु आहे. रज्जाक मणेरी या तरुण पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याचे गूढ उकळलेले नाही.