पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:30 AM2021-08-22T06:30:24+5:302021-08-22T06:30:45+5:30
डोंबिवलीतील एका इमारतीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग कार्ले याने केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीश कार्ले या पोलिसाने एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कार्ले याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर, पोलीस उपायुक्तांनी कार्ले याला सेवेतून निलंबित केले आहे.
डोंबिवलीतील एका इमारतीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग कार्ले याने केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यात ती इमारतीचा जिना चढत असताना कार्ले याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे कार्ले याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्या पोलीस ठाण्यात कार्ले कार्यरत होता, त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. कार्ले याच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेस काळिमा फासला गेला आहे.