मेघवाडी विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक केली आहे. तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती. ४० हजारांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
४० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने सापळा रचून एसीपी सुजाता पाटील यांना कार्यालयात अटक केली. मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सुजाता पाटील कार्यरत आहेत. पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने गाळा नं.०३, नादीर शहा तबेला, सुभाष नगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई-६० येथील २२० स्क्वे फुट क्षेत्रफळाचा गाळा भाडे तत्वावर दिला होता. सदर गाळा तक्रारदार यांनी दि. ०५/१०/२०२१ रोजी भाडेकरूकडून ताब्यात घेतला होता. सदर गाळयाचे कुलुप निता महाडीक व त्यांच्या साथिदाराने तोडल्याने मालकाने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. तिथे तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे त्य़ांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्या कार्यालयात दाद मागितली. यावेळी सुजाता पाटील यांनी त्यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. पहिल्याच दिवशी त्यांनी त्यातील 10000 रुपये घेतले. तसेच उर्वरित रक्कम नंतर देण्यास सांगितले होते. त्यापैकी 40 हजारांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
कोण आहेत सुजाता पाटील?
मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तयाआधी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदाचीही जबाबदारीहिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्रआत्महत्या किंवा राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत