शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, दोघा आयोजकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 3:42 AM

ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता.

नवी मुंबई -  ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सोडून देण्यात आले असून, दोघा आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.ऐरोली येथील खासगी जागेत हुक्का पार्टीचे बेकायदेशीरपणे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे काही ठिकाणी बॅनरदेखील लावण्यात आलेले, शिवाय ठरावीक तरुण-तरुणींना निमंत्रित करण्यात आले होते. यासाठी मुलींना व जोडप्यांना प्रवेश मोफत होता, तर एकट्या मुलांसाठी हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलेले.मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या या पार्टीला हेलोवीन पार्टी असे नाव देण्यात आले होते. याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी खात्री केली असता, ऐरोली सेक्टर ९ येथील खासगी जागेत मोठ्या संख्येने तरुण पार्टीसाठी जमल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक संंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गोडसे यांच्या पथकाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.या वेळी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. शिवाय पार्टीसाठी दारूचा देखील साठा त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पार्टीसाठी जमलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुले व ९ मुली आढळून आल्या.पार्टीत नशेसाठी अमली पदार्थांचा वापर झाला आहे का हे तपासणीसाठी सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सर्वांना सोडून देण्यात आले. मात्र, चाचणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तर बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी आयोजित केल्याप्रकरणी करण नरेश पाटील (२४) व मयूर भीमराव मढवी (२५) यांना अटक करण्यात आली आहे. करण मढवीच्या खासगी जागेत ही पार्टी सुरू होती. त्याठिकाणावरून डीजे मशिन, ७ हुक्का व ४ फ्लेवर तसेच इतर साहित्य असा ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पार्टी आयोजनामागचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; परंतु या हुक्का पार्टीमागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याची शंका वर्तवली जात आहे. त्यानुसार रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी