मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे हे काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत.काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी महिलेलाल बेड्या ठोकल्या आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, महिलेने सार्वजनिक ठिकाणी खाकी वर्दीचा अनादार केला, तरी संयम ठेवत महिलांचा आदर राखल्यामुळे त्या ट्रॅफिक हवालदाराचा एसीपी लता धोंडे यांनी काल भररस्त्यात गाडी थांबवून सत्कार केला. त्यांनी संयम बाळगला म्हणून परिस्थिती आटोक्यात आली. त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला आहे.मुंबईतील कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त, लता धोंडे यांनी ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर करण्यात आला, पण आपण संयम राखला, महिलेचा आदर कायम ठेवला असं लाटा धोंडे म्हणाल्या.काय आणि कसं घडलं हे प्रकरण ?दि. २३/१०/२०२० रोजी दुपारी १५ १५ . दरम्यान काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या ठिकाणी दैनंदिन कर्तव्य बजावित होते. त्यादरम्यान एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट मोटार सायकल चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांन विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी थांबविले. त्यावेळी पुरुष मोटार सायकलस्वार व महिला यांनी पोलिसांशी हुज्जत घालावयास सुरुवात केली. पार्टे यांनी त्यांना सर" व "मॅडम" असे संबोधून कोणतीही शिवीगाळ व अपशब्द उच्चारलेला नसताना देखील पोलिसाने अपशब्द व शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप महिला करु लागली. नंतर महिला त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण करु लागली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.पार्टे यांनी संयम दाखवलापोलीस हवालदार पार्टे यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की व मारहाण करीत असताना देखील पार्टे यांनी स्वत:चा संयम ढळू न देता कोणतीही अर्वाच्च भाषा न वापरता आरोपी महिलेला मॅडम" असे संबोधल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करीता महिला पोलीस अमलदारांना बोलावून घेतले. ही घटना पडत असताना पोलीस पार्टे यांनी आरोपी महिलेविरुध्द कोणतेही गैरवर्तन झालेले दिसून येत नाही.
'त्या' ट्रॅफिक पोलिसाने बाळगलेल्या संयमाची दखल, पोलीस आयुक्तांनी केले सन्मानित
By पूनम अपराज | Published: October 29, 2020 4:30 PM
Traffic Police Honored : ही घटना पडत असताना पोलीस पार्टे यांनी आरोपी महिलेविरुध्द कोणतेही गैरवर्तन झालेले दिसून येत नाही.
ठळक मुद्देच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला आहे.