नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींच्या वर गेली असून मृतांचा आकडा देखील वाढला आहे. कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच काही ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना अचानक नवरदेवाची लग्न मंडपातून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील शिवलोक कॉलनीत ही घटना घडली आहे.
शिवलोक कॉलनीत एका विवाहसोहळ्य़ाचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्तपदीची तयारी सुरू असतानाच अचानक लग्नात नवरदेवाच्या प्रेयसीची एन्ट्री झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला. प्रेयसीने हे लग्न थांबवलं आणि पोलिसांनी लग्न मंडपातूनच नवरदेवाला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शिवलोक कॉलनीतील एका तरुणीचं लग्न ठरलं होतं. याचदरम्यान दुपारी नवरदेव वरात घेऊन याठिकाणी दाखल झाला आणि नवरीबाईच्या घरी पोहोचला. पाहुणे नाश्ता करत होते. इतक्यात एक तरुणी गंगानगर पोलिसांसोबत या लग्नसमारंभात हजर झाली.
नवरदेवाने तिला धोका दिला असून आता तो दुसरं लग्न करत आहे असा आरोप प्रेयसीने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लग्नमंडपात पाहून एकच गोंधळ झाला. याचदरम्यान पोलिसांनी नवरदेवासोबत आणखी काही जणांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रेमासाठी अनेकजण काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी तिला इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. बडू गावात ही हैराण करणारी घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
बाबो! शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं; विद्यार्थिनीने त्याच्यासाठी घरदार सोडलं
शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना घरच्यांनी दिली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. प्रेमाला विरोध झाल्यानंतर विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा इंग्रजीचा शिक्षक यांचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची माहिती मिळाली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा अनेकदा सल्ला दिला होता. मात्र या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्या. त्यानै एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदारानं ते द्यायला नकार दिला. अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले.